पाटण तालुक्यातील करपेवाडी येथे भाग्यश्री संतोष माने या युवतीच्या खुनाचा उलगडा झाला असून अंधश्रद्धेतून गुप्तधनाच्या लालसेपोटी तिची गळा चिरुन हत्या केल्याचे उघड झाले आहे. चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. (crime invistigation) या नळबळीचे कनेक्शन सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे 9 जणांच्या झालेल्या हत्येशी असल्याचे उघड झाले आहे.
या दोन्ही घटना अंधश्रद्धेतून गुप्तधन मिळवण्यासाठी झाल्या असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. 22 जानेवारी 2019 रोजी भाग्यश्री माने हिची गळा चिरून अज्ञाताने हत्या केली होती. (crime invistigation) त्यावेळी मृतदेह ऊसाच्या शेतामध्ये आढळून आला होता. सदर युवती ज्या रस्त्याने कॉले मध्ये जात असे त्याच शिवारात तिचा मृतदेह आढळला होता. त्यावेळी हा खून अंधश्रद्धेतून झाला असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यांनी भाग्यश्रीच्या वडिलांना संशयित म्हणून अटक केली होती. मात्र पुराव्याअभावी त्याची सुटका झाली होती.
साडेतीन वर्षे पोलिस या खुनाच्या तपासावर होते. या खुनाच्या संदर्भातील धागेदोरे पोलिसांना म्हैसाळ (सांगली) येथे महिन्यापूर्वी घडलेल्या सामूहिक हत्याकांडामध्ये मिळाले. येथे वनमोरे कुटुंबातील १ जणांची हत्या ही अंधश्रद्धेतून गुप्तधन मिळवण्यासाठी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेतील मुख्य संशयित आरोपी सोलापूर जिल्ह्यातील आब्बास महम्मद अली बागवान याने व त्याच्या साथीदाराने मिळून हे हत्याकांड घडविले
होते.
हे हत्याकांड गुप्तधन मिळवण्यासाठी घडवले होते. यातील मुख्य संयशित आरोपी आब्बास बागवान याच्या नातेवाईकाच्या संपर्कात भाग्यश्री मानेच्या हत्येतील एक संशयित असल्याचे पोलिस तपासात समोर आले. बागवान याच्या नातेवाईकाने एक सिमकार्ड हे मानेच्या हत्येतील एका संशयित आरोपीला दिले असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी त्या सिमकार्डचे कॉल डिटेल्स चेक केले असता पोलिस त्या संशयितापर्यंत पोहोचले. संशयित आरोपीने या गुन्ह्यातील मुख्य आरोपी फुलचंद राठोड याचे नाव सांगितले. पोलिसांनी तातडीने मांत्रिक फुलचंद राठोडच . मुसक्या आवळल्या. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.