Monday, July 7, 2025
Homeक्रीडाटीम इंडियाने 3 धावांनी जिंकला सामना, वनडे सीरिजमध्ये वेस्ट इंडीजचा सलग 7...

टीम इंडियाने 3 धावांनी जिंकला सामना, वनडे सीरिजमध्ये वेस्ट इंडीजचा सलग 7 वा पराभव

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्याच वन डे सीरिजमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडीजचा पराभव केला आहे. या सामन्यात टीम इंडिया 3 धावांनी विजयी झाली आहे. या विजयासोबतच भारताने वन डे सीरिजची सुरुवात विजयाने करत यामध्ये 1-0 ची आघाडी घेतली आहे. हा सामना भारताने जिंकला असला तरी वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी दिलेली दमदार झुंज सर्वांच्याच लक्षात राहील. सामन्याच्या अखेरीस वेस्ट इंडीजच्या रोमारीयो शेफर्ड आणि अकेल हुसेनच्या धुवाधार खेळीमुळे हा सामना चांगलाच रोमांचक झाला. दोघांनी अखेरच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली. पण फक्त 3 धावा कमी पडल्याने वेस्ट इंडीजचा पराभव झाला.



या सामन्यामध्ये सुरुवातीला फलंदाजी करत भारताने 50 षटकात 308 धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावांचे आव्हान होते. पण वेस्ट इंडीज 50 षटकात 6 गडी गमावून 305 धावाच करु शकले. सामन्याच्या अखेरीस रोमारीयो शेफर्डच्या धुवाधार खेळीने सामना अतिशय रोमांचक झाला पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शेफर्डने 25 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 39 धावा केल्या. त्याच्यासह अकील हुसेननेही नाबाद 33 धावांचे योगदान दिले. वन डेमधील वेस्ट इंडिजचा हा सलग सातवा पराभव आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -