Monday, July 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : विजेच्या खांबावरून पडून तरुणाचा मृत्यू

कोल्हापूर : विजेच्या खांबावरून पडून तरुणाचा मृत्यू

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : पडवळवाडी (ता. करवीर) येथे महावितरणचे काम करताना खांबावरून पडून प्रथमेश विजय सुतार (वय 20, रा. आसुर्ले, पन्हाळा) याचा मृत्यू झाला. तो शिकाऊ उमेदवार (अप्रैटिस) म्हणून काम करत होता. मात्र, शिकाऊ म्हणून असताना त्याला खांबावर का चढविले? असा सवाल संतप्त नातेवाईकांनी उपस्थित केला. महावितरणचे जबाबदार अधिकारी वेळेत रुग्णालयात न आल्याने सीपीआर आवारात मोठी गर्दी जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


प्रथमेश महावितरणच्या केर्ली डिव्हीजनकडे शिकाऊ म्हणून काम करत होता. शुक्रवारी सायंकाळी तो पन्हाळा रोडवरील पडवळवाडी येथे कामानिमित्त गेला होता. येथे खांबावरील बिघाड दुरुस्तीसाठी तो खांबावर चढला असता वरून पडून जखमी झाला. बेशुद्धावस्थेत त्याला सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रथमेश हा शिकाऊ म्हणून कामाला असताना त्याला खांबावर का चढवले?, त्याच्यासोबत गेलेले कर्मचारी कोठे आहेत?, प्रथमेशला दवाखान्यात दाखल कोणी केले? असे प्रश्न नातेवाईक, मित्रांनी उपस्थित केले.

महावितरणचे संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना तत्काळ रुग्णालयात बोलवा, अशी मागणी संतप्त जमावाने सुरू केली. प्रथमेश सोबत नेमके काय घडले हे सांगितल्याशिवाय मृतदेहाची उत्तरीय तपासणी होऊ देणार नाही, अशा पवित्रा जमावाने घेतला होता. वडणगे विभागाचे महावितरणचे अधिकारी रुग्णालयात आले. मात्र, प्रथमेश सोबत असणाऱ्यांना बोलावल्याशिवाय उत्तरीय तपासणी होऊ देणार नाही, असे नातेवाईक सांगत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -