ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली; शिवसेना युवासेना आणि युवतीसेनेच्या अधिकाऱ्यांसह 31 पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेस रामराम ठोकला. आपल्या पदांचे राजीनाने देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला. शिवसेनेचे युवासेना अधिकारी सचिन कांबळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दरम्यान, जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्यामुळे शिवसेनेची वाढ खुंटली. त्यांना पलूस – कडेगावमध्ये नोटापेक्षाही जादा मते मिळाली नाहीत. एक नगरसेवकही निवडून आणता आला नाही, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, कांबळे यांच्यासह समन्वयक मतीन काझी, युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख प्रियांका पवार, जिल्हाप्रमुख स्वाती पाटील, तालुकाप्रमुख अभिजित सावंत, रतन कोरडे, अमोल घाडगे, अझर शेख, साद सय्यद, ऋतुजा पाटील, वाळवा तालुक्यातील विजय डांगे, सौरभ खोत, सौरभ हवलदार, अजित पाटील, जत तालुक्यातील सचिन मदने, तासगावमधून नंदू मंडले, हर्ष माळी, विशाल जाधव, सांगलीतून रोहन वाल्मिकी यांनी राजीनामे दिले. यावेळी हे पदाधिकारी उपस्थित होते.