Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंग‘नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिलेली आणि आता एकनाथ शिंदे..’ नितेश...

‘नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिलेली आणि आता एकनाथ शिंदे..’ नितेश राणेंचा गंभीर आरोप

एकनाथ शिंदेंसह शिवसेना आणि अपक्ष आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. (politics) यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत मिळून राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र, एवढ्यावरच हा राजकीय संघर्ष थांबला नाही. तर यानंतर उद्धव ठाकरेंना शिंदेंनी अनेक धक्के दिले. आमदारांपाठोपाठ अनेक खासदार, नगरसेवक, पदाधिकारी अनेकांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिलं. यानंतर शिवसेनेच्या झालेल्या अवस्थेवरुन राजकीय नेत्यांनी टोले लगावण्यास सुरुवात केली आहे.

“एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती.” असा दावा सुहास कांदे यांनी केला होता. यावर आता नितेश राणे यांनीही एक ट्विट केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं, एकनाथ शिंदे यांच्या सारखंच माझ्या वडिलांनी सेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठीही तथाकथित विवेकी
आणि सभ्य पक्षप्रमुखाकडून अनेक “सुपारी” दिल्या गेल्या.

आधी ही म्याऊ म्याऊ संपू द्या. मग आपण “वस्त्रहरण” सुरू करू. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी एक ट्विट केलं होतं.

यात त्यांनी मध्यप्रदेश, गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही आता धर्मांतर बंदी कायदा आणून महिलांना न्याय द्या, अशी मागणी केली होती. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं होतं, की आता महाराष्ट्रात भगव्याचं राज्य आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरातप्रमाणे आपल्याकडेही धर्मांतर बंदी कायदा आणला पाहिजे. जेणेकरून निष्पाप महिलांना फसवून, त्यांचं धर्मांतर करून त्यांचा होणारा छळ रोखला जावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -