Sunday, August 10, 2025
Homeमहाराष्ट्रसाताऱ्यात थरारक खून ; मारहाण करून लटकवले फासावर

साताऱ्यात थरारक खून ; मारहाण करून लटकवले फासावर

साताऱ्यात तीन आठवड्यापूर्वी भर रस्त्यात एका तरूणाला गोळ्या घालून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका तरुणाचा खून करून त्याला फासावर लटकावले आहे. संदिप मच्छिद्र दबडे (वय ३० रा. दुर्गा पेठ सातारा) असं मयताचे नाव आहे. या घटनेने सातारा गुन्हेगाराचा अड्डा होतोय का अशी भिती व्यक्त केली जात आहे. तसेचं खुनाचे कनेक्शन मुंबई आहे की व्यसनाधीनतेतून हा खून झालाय अशी चर्चा परिसरात सुरु आहे. खुनाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संदीप दबडे या तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह घरातील तुळईला लटकवला होता. तोंड, हात-पाय बांधलेल्या अवस्थेत संदीपचा मृतदेह आढळून आला आहे. साताऱ्यात (Satara) २ जुलैला भरदिवसा महामार्गालगत असलेल्या नटराज मंदिरातील आवारात अर्जुन यादव या युवकावर गोळी घालून खून करण्यात आला होता. अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली आणि त्यानंतर आरोपी फरार झाले होते. दरम्यान आज घरातच मृतदेह सापडल्याने खून कोणी आणि कोणत्या कारणातून केला असेल याची चर्चा परिसरात सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -