Sunday, August 10, 2025
Homeमहाराष्ट्रसातारा : केळवली धबधब्यात युवक बुडाला

सातारा : केळवली धबधब्यात युवक बुडाला

साताऱ्यातील काही युवक शुक्रवारी केळवली धबधबा पहायला गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने एक युवक पाण्यात बुडाला असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सातारा (विकासनगर) येथील राहुल माने (वय 18) तसेच त्याचे काही मित्र शुक्रवारी केळवली धबधबा पहायला गेले होते. यावेळी राहुल आणि त्याचे मित्र पाण्यात उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने राहुल पाण्यात बुडाला. दुर्दैव म्हणजे या मित्रांनी ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. घटनेनंतर हे सर्वजन दुपारी उशीरा आपल्या घरी पोहोचले. त्यानंतर राहुल घरी न आल्याने त्याच्या घरातील लोकांनी पोलीस स्टेशनला ही घटना कळवली. मात्र, तो पर्यंत बराच उशीर झाल्याने शोधकार्य हाती घेता येणार नव्हते. आज सकाळी पोलीस यंत्रणा धबधबा परिसरात पोहोचली असून शोधकार्य सुरू असल्याचे समजते. या घटनेबाबत अधिक माहिती समजू शकली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -