68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (Awards )घोषणा दिल्लीत करण्यात आली. यामध्ये बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) याला मिळाला आहे. यासोबतच सूर्याला (Surya) देखील हा पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी 10 सदस्यीय ज्युरीचे नेतृत्व चित्रपट निर्माते विपुल शाह यांनी केले. इतर सदस्यांमध्ये सिनेमॅटोग्राफर धरम गुलाटी, जीएस भास्कर, श्रीलेखा मुखर्जी, ए कार्तिकराजा, व्हीएन आदित्य, संजीव रतन, विजी टँपी, एस थंगादुराई आणि निशिगंधा यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय चित्रपट (Film) पुरस्कारांसाठी 400 चित्रपटांचे अर्ज आले होते. हे चित्रपट 30 वेगवेगळ्या भाषांमध्ये आहेत. मध्य प्रदेशला मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेटचा पुरस्कार मिळाला. ज्युरींनी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचा विशेष उल्लेख केला. पुरस्कार पाच श्रेणींमध्ये देण्यात येत आले. हे पुरस्कार 2022 साठी दिले जात आहेत. या वर्षी फीचर फिल्म श्रेणीमध्ये 305 चित्रपटांना नामांकन मिळाले आहे.
सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार
राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांमध्ये ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटासाठी अभिनेता अजय देवगणला सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. यासोबतच सूर्याला ‘सोराराई पोतरू’(Soorarai Pottru) साठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
30 भाषांमधील चित्रपटांना दिला जाणार पुरस्कार
विजेत्यांची नावे आज नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे पत्रकार परिषदेद्वारे जाहीर करण्यात आली. अनेक चित्रपट, अभिनेते आणि अभिनेत्री यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे दावेदार आहेत. पुरस्काराच्या श्रेणींबद्दल बोलायचे तर, सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट, सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट, सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट अशा 30 भाषांमध्ये दिला जाईल.
पुरस्कारांची यादी
बेस्ट अॅक्टर- अजय देवगन (ताण्हाजी: द अनसंग वॉरियर) आणि सूर्या (सोरारई पोटरू)
बेस्ट बुक ऑन सिनेमा- द लॉन्गेस्ट किस- किश्वर देसाई याचे लेखक आहेत.
बेस्ट फीचर फिल्म- सोरारई पोटरू (तमिळ)
बेस्ट हिंदी फिल्म- तुलसीदास जूनियर (आशुतोष गोवारिकर)
बेस्ट पॉप्यूलर फिल्म- ताण्हाजी: द अनसंग वॉरियर
बेस्ट संगीतकार- मनोज मुन्तशिर (सायना)
बेस्ट अॅक्ट्रेस- अपर्णा बालमुरली (सोरारई पोटरू)