Saturday, August 9, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूची धास्ती

कोल्हापूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूची धास्ती

ताजी बातमी ऑनलाईन टीम


कोल्हापूर ; जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे संकट गंभीर होताना दिसत आहे. पंधरा दिवसांत तिघांचा मृत्यू झाला आहे. कोरोना, डेंग्यूनंतर स्वाईन फ्लू संसर्गाने डोके वर काढले असून, आरोग्य यंत्रणा अजूनही सुस्तच आहे. स्वाईन फ्लूने किती जणांचा बळी जाण्याची वाट प्रशासन पाहणार, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात पंधरा दिवसांत 12 स्वाईन फ्लूबाधित सापडले. त्यांच्या संपर्कातील किती जणांची स्वब तपासणी झाली, हा संशोधनाचा विषय आहे. स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत असताना ती रोखण्याची । जबाबदारी असणाऱ्या आरोग्य विभागाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही असे दिसते.

कोरोना आणि स्वाईन फ्लूमध्ये बऱ्यापैकी लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे कोरोना आहे, असे समजून रुग्ण उपचार घेतात. काहींचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह येतो आणि लक्षणे कायम राहतात. गंभीर अवस्थेत रुग्ण दवाखान्यात दाखल होतो. पुरेशी जाणीव व जागृती नसणे आणि रुग्ण शोधून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -