Saturday, August 9, 2025
Homeकोल्हापूरकळंबा तलाव ओव्हर फ्लो'

कळंबा तलाव ओव्हर फ्लो’

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : कळंबा तलाव शनिवारी पूर्ण भरला. तलावाच्या सांडव्यावरून पाणी । वाहू लागले आहे. (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूरः पुढारी वृत्तसेवा पावसाचा जोर नसला तरी कळंबा तलाव शनिवारी दुपारी पूर्ण क्षमतेने भरला. यानंतर धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर ओसंडून वाहणारा कळंबा पाहण्यासाठी नागरिकांची तलावावर गर्दी झाली होती. दरम्यान, शनिवारी पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधाराही खुला झाला. राजाराम बंधाऱ्यावर केवळ तीन ते चार इंच पाणी होते. रात्री उशिरा हा बंधाराही खुला होण्याची शक्यता आहे.



जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने कळंबा तलावातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली होती. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. मात्र, पाणी पातळीत वाढ होतच राहिली. गेल्या तीनचार दिवसांपासून पावसाने पूर्ण उघडीप दिली. यामुळे संथगतीने पाणी पातळी वाढत होती.

शुक्रवारीच कळंबा काठोकाठ भरला होता. शनिवारी सकाळपासून तलावाच्या सांडव्यावरून वाऱ्याच्या हेलकाव्याने पाणी खाली पडत होते. दुपारी दोन-अडीचच्या सुमारास सांडव्यावरून पाणी वाहू लागले. सांडव्यावरून कोसळणाऱ्या पाण्याचा जोर कमी असल्याने सांडव्याखाली आबालवृद्धांची मोठी गर्दी झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -