ताजी बातमी ऑनलाईन टीम
तासगाव शहरातील सहा कपल कॅफेवर गुरुवारी तासगाव पोलिसांनी छापा टाकून चालकांना समज दिली. दरम्यान, शहरात वाढलेले कपल कॅफे चर्चेचा विषय होऊ लागले आहेत.
शहरातील जोशी गल्ली, घिसाडी पूल, दत्तमाळ, तहसीलदार कार्यालय परिसर, वंदे मातरम चौक, साने गुरुजी नाट्यगृहाजवळ यासह अनेक ठिकाणी सध्या कपल कॅफेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याठिकाणी तरुण-तरुणींना केवळ बसण्यास परवानगी देऊन त्यांच्याकडून प्रति अर्धा तास 50 रुपये अशा दराने फक्त बसण्यासाठी पैसे घेतले जातात. याठिकाणी पडदे लावून अंधार करून जोडप्यांना बसायला जागा दिली जाते. याबाबत पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांना माहिती मिळाली. त्यांनी त्वरित शहरातील अशा सहा कॅफेवर छापा टाकून त्यांना सूचना केली.






