ताजी बातमी ऑनलाईन टीम
पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नरबळी देण्याच्या उद्देशाने साडे तीन वर्षीय मुलीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये चिखली घडला आहे.
मात्र पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वेगात सूत्रे हलवत मुलीची सुखरुप सुटका (Rescued) केली आहे. र याप्रकरणी सहा जणांना अटक (Arrest) करण्यात आली असून यात दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. आरोपींमध्ये विमल संतोष चौगुले (28 रा. जुन्नर पुणे), संतोष मनोहर चौगुले (41 रा. जुन्नर), सुनिता अशोक नलावडे (40 रा. ताम्हणे वस्ती चिखली), निकिता अशोक नलावडे (22) आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.