Saturday, August 2, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : चंद्रकांतदादांच्या 'काळजावर दगड' वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात

कोल्हापूर : चंद्रकांतदादांच्या ‘काळजावर दगड’ वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरला जाणार आहेत. दिल्ली दौऱ्यावर असलेले शिंदे थेट कोल्हापूर गाठतील. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर शिंदे हे चंद्रकांतदादांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांना काळजावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य चंद्रकांतदादांनी नुकतंच भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत केलं होतं. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या प्रतिक्रियेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी २ वाजता विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी ४ वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तिथून ते छत्रपती संभाजी पार्क येथे चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचतील. सायंकाळी ५.१५ वाजता मुख्यमंत्री विमानाने मुंबईकडे रवाना होतील. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे निधन झाले आहे. कोल्हापूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 91 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कष्टाला कमी पडू नकोस, आयुष्यात तुला काही कमी पडणार नाही, अशी शिकवण चंद्रकांतदादांना त्यांच्या मातोश्री सरस्वती पाटील यांनी कायम दिली. दादांनीही त्यांनी शिकवण अंगीकारली. कठीण परिस्थितीत संघर्ष करायला शिकवणारी मायमाऊली गेल्याने दाटांडगा आयुष्यात पोकळी निर्माण झालीय.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

गेल्या अडीच वर्षातील चित्र पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदलण्याची गरज होती आणि तसा बदल झाला. हा बदल होत असताना असा एक नेता देण्याची गरज होती, जो योग्य मेसेज देईल. जो चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल. असे असताना आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आपल्या सर्वांना दु:ख झाले. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले ते देवेंद्र फडणवीस होय, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. एकनाथ शिंदेंना जड अंतकरणाने मुख्यमंत्री केल्याचं वक्तव्य खुद्द प्रदेशाध्यक्षांनीच केल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. शिंदे गट आणि भाजप युतीच्या सुरुवातीलाच, तेही मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याअगोदर मनातील कटुता व्यक्त करणारं विधान भाजपकडून आलं आहे. चंद्रकांतदादांचं वक्तव्य ही भाजपची भूमिका असल्याचा समज शिंदे गटात निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर दोन्ही प. दुरावा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकनाथ शिंदेंना जड अंतकरणाने मुख्यमंत्री केल्याचं वक्तव्य खुद्द प्रदेशाध्यक्षांनीच केल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. शिंदे गट आणि भाजप युतीच्या सुरुवातीलाच, तेही मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याअगोदर मनातील कटुता व्यक्त करणारं विधान भाजपकडून आलं आहे. चंद्रकांतदादांचं वक्तव्य ही भाजपची भूमिका असल्याचा समज शिंदे गटात निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षात दुरावा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच भाजपने भाषणाचा व्हिडिओ ट्विटर, यूट्यूबसारख्या डिजिटल माध्यमांवरुन डिलीट केल्याची चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -