Tuesday, August 5, 2025
Homeमनोरंजनन्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंह विरोधात गुन्हा दाखल

न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंह विरोधात गुन्हा दाखल

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या न्यूडफोटोमुळे चर्चेत आहे. रणवीरच्या न्यूड फोटोमुळे सोशल मीडीयावर त्याच्यावर टीकाही करण्यात येत आहे. तर
काही जणांनी रणवीरचे कौतुकही केले आहे. दरम्यान, न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंहवर मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


न्यूडफोटोशूटमुळे महिलांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप गुन्हा दाखल करतेवेळी करण्यात आला आहे. रणवीरने पेपर या मासिकासाठी हे फोटोशूट केले होते. हे फोटो अनेकांना आवडले आहेत तर दुसरीकडे अनेकांनी रणवीरला ट्रोलही केले आहे. “रणवीरचे अशा प्रकारचे फोटो अगदीच नवीन नाहीत. रणवीरने विविध प्रकारच्या फॅशनचे प्रयोग यापूर्वी केलेले आहेत. त्याच्या फॅशनवर टोकाच्या प्रतिक्रिया यापूर्वीही आलेल्या आहेत. पण रणवीरला हा प्रोजेक्ट करायचा होता. याबद्दल त्याची भूमिका स्पष्ट होती.” मे-जूनमध्येच हे फोटो तयार होते, पण रणवीरला थोडी वाट पाहावी, असे वाटत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -