*_1) मेष राशी भविष्य (Friday, July 29, 2022)_*
विश्रांती, विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा. कुणाचा सल्ला न घेता आज तुम्ही पैसा कुठे ही इन्व्हेस्ट करू नका. मोकळ्या वेळेचा उपयोग करून कुटूंबातील सदस्यांना मदत करा. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको, अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. आज तुमच्या कष्टाचे चीज होईल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल.
उपाय :- चांगल्या आरोग्याच्या लाभाला पुनः प्राप्त करण्यासाठी काळे चणे, काळे तीळ आणि नारळाला वाहत्या पाण्यात अर्पण करा.
*_2) वृषभ राशी भविष्य (Friday, July 29, 2022)_*
कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षादेखील वाढलेल्या असतील. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ जाता जाणार नाही. आपल्या व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणालातरी फायदा होईल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळथील, पण तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल.
उपाय :- गरीब आणि गरजू लोकांना लोखंडाच्या भांड्यात दान द्या आणि कौटुंबिक गोष्टींना आनंदी ठेवा.
*_3) मिथुन राशी भविष्य (Friday, July 29, 2022)_*
ध्यानधारणा आराम मिळवून देईल. जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहे त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटते. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येईल. संकलन-सुरज राकले, पुणे.
उपाय :- आपल्या प्रियकर/ प्रियसी ला भेटण्याच्या वेळी लाल गुलाब नक्की भेट द्या, याने प्रेम संबंध मजबुत होतात.
*_4) कर्क राशी भविष्य (Friday, July 29, 2022)_*
आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्यांकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसा मागतात आणि नंतर परत करत नाही. नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घ्या. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की, मैत्रीमुळे आपल्या महत्वाच्या वेळेला खराब करू नका. मित्र हे येणाऱ्या काळात ही भेटू शकतात परंतु, शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम आहे. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राइझ मिळण्याची शक्यता आहे.
उपाय :- आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर सुर्य स्नान (अंघोळीच्या पाण्यात गहू, साबुत मसूर, लाल कुंकू टाकून) करा.
*_5) सिंह राशी भविष्य (Friday, July 29, 2022)_*
आपल्या आरोग्याबद्दल विशेषकरून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे.
उपाय :- माकडांना गूळ आणि चणे खाऊ घाला आणि स्वस्थ जीवन व्यतीत करा.
*_6) कन्या राशी भविष्य (Friday, July 29, 2022)_*
तुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील. कुठलाही मूर्खपणा करण्यापूर्वी तुमच्या वागणुकीच्या परिणामांबद्दल विचार करा. शक्य असेल तर तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. तुम्हाला अपेक्षित असलेली कौतुकाची थाप, मान्यता आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हाल. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल.
उपाय :- पिठामध्ये काळे आणि पांढरे तीळ मिळावा आणि वाढत्या स्वास्थासाठी माश्यांना खाऊ घालण्यासाठी नरम गोळे बनवा.
*_7) तुला राशी भविष्य (Friday, July 29, 2022)_*
काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. परंतु तुम्ही भांबावून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा – आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. आजच्या दिवशी मुलं आणि कुटुंबावर लक्ष केंद्रीत करा. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकतात आणि टीव्ही वर बरेच सिनेमा किंवा प्रोग्राम पाहू शकतात. आज खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यावर दुष्परिणाम होईल.
उपाय :- चांगला फायदा मिळवण्यासाठी गायींना हिरवे घास (ज्वार, गवत) खाऊ घाला.
*_8) वृश्चिक राशी भविष्य (Friday, July 29, 2022)_*
तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. प्रिय व्यक्तीला फुले आणि सुंदर भेटवस्तू देऊन संध्याकाळ प्रणयराधनेत घालवाल. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. त्या गोष्टी आठवणे ज्याचे आता तुमच्या जीवनात काहीच महत्व नाही हे तुमच्यासाठी ठीक नाही. असे करणे तुम्ही आपला वेळ खराब कराल अजून काही नाही. आजचा दिवस हा तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहे! प्रेम आणि रोमान्स करताना तुम्ही सीमा गाठणार आहात.
उपाय :- आर्थिक परिस्थिती चांगली ठेवण्यासाठी हळदीचे दूध प्या.
*_9) धनु राशी भविष्य (Friday, July 29, 2022)_*
तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. मुलांवर आपली मते लादण्यामुळे ती त्रस्त होतील. त्यापेक्षा आपणास काय सांगायचे ते त्यांना समजण्यास मदत होईल असे करा, ते आपली मते स्वीकारतील. रोमान्ससाठी चांगला दिवस. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टीकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. कुठल्या पार्क मध्ये फिरतांना आज तुमची भेट कुणी अश्या व्यक्ती सोबत होऊ शकते ज्याच्या सोबत तुमचे मतभेद होते. आजचा दिवस खूप रोमँटिक आहे. चांगले जेवण, सुवास आणि आनंद या तीनही घटकांचा संगम होऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत छान वेळ व्यतीत कराल. संकलन-सुरज राकले, पुणे.
उपाय :- सकाळी आणि संध्याकाळी 11 वेळा ॐ नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप करा याने कुटुंबात आनंद राहील.
*_10) मकर राशी भविष्य (Friday, July 29, 2022)_*
मोतीबिंदू असणा-या रुग्णांनी प्रदुषित वातावरणात जाणे टाळावे. धुरामुळे आपल्या डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळावे. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी तुम्ही रागावर मात करणे अत्यंत गरजेचे आहे. अचानक प्रणयाराधन करायला मिळाल्याने तुम्ही गोंधळून जाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. खेळणे हा जीवनातील महत्वाचा भाग आहे परंतु, खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की, त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणात होईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आज पुन्हा प्रेमात पडाल, कारण तो/ती यासाठी खरच लायक आहे.
उपाय :- खिरणीची मुळे पांढऱ्या कपड्यामध्ये गुंढाळून आपल्या जवळ ठेवल्यास आरोग्यामध्ये सुधारणा होईल.
*_11) कुंभ राशी भविष्य (Friday, July 29, 2022)_*
विनाकारण स्वत:ची निंदा करून तुमचा उत्साह घालवू नका. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. नवजात बालकाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवतील. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल.
उपाय :- कौटुंबिक समृद्धी आणि सुखात वाढ होण्यासाठी जौ च्या पीठाने बनवलेल्या गोळ्या माश्यांना खाऊ घाला.
*_12) मीन राशी भविष्य (Friday, July 29, 2022)_*
तंदुरुस्ती आणि वजन घटविण्याचे उपक्रम आपल्या शरीरास चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरतील. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. तुमच्या फायद्यासाठी तुमच्या बुद्धिमत्तेची ताकद वापरा. नवीन संकल्पना देण्याबरोरच व्यावसायिक प्रकल्प पूर्ण करण्यात तुम्हाला त्याचा उपयोग होईल. जर तुम्हाला वाटते की, काही लोकांसोबत संगती करणे तुमच्यासाठी योग्य नाही आणि त्यांच्या सोबत राहून तुमची वेळ खराब होते तर, त्यांचा साथ तुम्ही सोडला पाहिजे. विवाहित जोडपी एकत्र राहत असली तरी वातावरण नेहमीच रोमँटिक नसतं, पण आजचा दिवस मात्र खूप खूप रोमँटिक असणार आहे.
उपाय :- धन प्राप्तीसाठी दुध किंवा पाण्यामध्ये केशर टाकून प्या.
राशि भविष्य; दिनांक 29 जुलै 2022
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -