ताजी बातमी ऑनलाईन टीम
सामंथा रुथ प्रभु ही एक प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. गेल्या वर्षीच सामंथाने नागा चैतन्य याला घटस्फोट दिला. सामंथा आणि नागा चैतन्यच्या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सामंथा आणि नागा चैतन्य विभक्त झाल्यानंतरही अनेक चर्चेत होते. आता सामंथाबाबतीत मोठी माहिती प्रकाशात आली आहे.
सामंथाने नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर त्याच्याकडे 200 कोटी रुपयांची पोटगी मागितली, असी माहिती समोर आली होती. मात्र, सामंथाने हे वृत्त फेटाळलं होते. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यात अभिनेता मुरली मोहन यांनी सामंथाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. सामंथा रुथ प्रभु हिने नागा चैतन्य यांचंच घर विकत घेतलं आहे. विशेष म्हणजे याच घरात घटस्फोटापूर्वी सामंथा आणि नागा चैतन्य एकत्र राहत होते. सामंथाने या घरासाठी मोठी किंमत मोजली असल्याचे देखील समजते.