सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधामध्ये असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. या तरुणांना पासपोर्ट ऑफिसमध्ये (Passport Office) सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. केंद्रीय पासपोर्ट संघटना, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून भारत सरकारच्या पासपोर्ट ऑफिसमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (Passport Office Recruitment 2022 ) अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
अधिकृत वेबसाईट
passportindia.gov.in
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 7 ऑगस्ट 2022
पदांचा तपशील
एकूण रिक्त पदांची संख्या – 24
पासपोर्ट अधिकारी – 1 पदं
सहाय्यक पासपोर्ट अधिकारी – 23 पदं
शैक्षणिक पात्रता
पासपोर्ट अधिकारी –
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार पालक संवर्ग किंवा विभागात किंवा तत्सम पदावर 5 वर्षांच्या सेवेसह नियमितपणे नियुक्त केलेला असावा. या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असावा. तसंच त्याच्याकडे 9 वर्षांचा अनुभव असावा.
सहाय्यक पासपोर्ट अधिकारी –
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार पालक संवर्ग किंवा विभागात किंवा तत्सम पदावर 5 वर्षांच्या सेवेसह नियमितपणे नियुक्त केलेला असावा. या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असावा. तसंच त्याच्याकडे 5 वर्षांचा अनुभव असावा.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे.