Thursday, June 26, 2025
Homeसांगलीअवैध रीत्या नाग बाळगल्याप्रकरणी येथील युवकावर गुन्हा

अवैध रीत्या नाग बाळगल्याप्रकरणी येथील युवकावर गुन्हा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बेकायदेशीर अवैध रीत्या नाग हा वन्य प्राणी स्वतःच्या ताब्यात ठेवल्यामुळे चिकुर्डे येथील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला.सागर लक्ष्मण यादव वय ३६ रा.चिकुर्डे ता.वाळवा असे या युवकांचे नाव आहे.याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की सागर यांने अवैध रीत्या नाग स्वतः च्या जवळ ठेवल्याचे आढळले.त्याच्या शेताजवळील शेडमध्ये नाग लपवून ठेवला होता.

यावेळी उपवनरंक्षक खात्याला माहिती मिळताच उपवनसंरक्षक श्रीमती निता कट्टे, सहाय्यक वनसंरक्षक डॉ अजित सासणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र सचिन जाधव,वनपाल चंद्रकांत देशमुख,वनरक्षक प्रकाश पाटील सर्प मित्र सुशीलकुमार गायकवाड यांनी युवकाला ताब्यात घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -