Saturday, July 5, 2025
Homeकोल्हापूरपरत यायचं असेल तर आमचे दरवाजे नेहमी खुले; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना सल्ला

परत यायचं असेल तर आमचे दरवाजे नेहमी खुले; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना सल्ला

उठाव करायला हिमंत लागते, उठाव करणारे सुरतला जातं नाहीत. हे गद्दारांचे सरकार आहे, महिनाभरात जाईल. सध्याचे राजकारण घाणेरडे आहे. मी तरुणांना कसे म्हणू राजकारणात या. गद्दारांना इतकच सांगावसं वाटतं की, तुम्हाला तीथे राहायचं असेल किंवा तुमच्यावर काही दडपण असेल तर तिथेच राहा. पण तुम्ही राजीनामा द्या आणि पुन्हा नव्याने निवडून या असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला दिला. यावेळी त्यांनी तिखट शब्दात टीका केली. कुडाळ, सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग येथील शिवसंवाद यात्रेदरम्यान संवाद साधल्यानंतर त्यांनी कोल्हापुरात शिवसैनिकांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना ते म्हणाले, या गद्दारात दोन गट आहेत. एक गट स्वतासाठी, राक्षसी महत्वाकांक्षा पोटी गेलेला आहे. तर दुसरा गट असा आहे ज्यांना फसवून नेलं आहे. जी गद्दारी झाली आहे त्याबद्दल आमच्या मनात दुःख आहे पण. हे दुःख बाजूला करत आम्ही लोकांना भेटत आहोत आशीर्वाद घेत आहोत. पण दुःख एकच आहे आमच्या पाठीत त्यांनी कठीण काळात खंजीर खुपसला. गद्दारांना इतकच सांगावसं वाटतं त्यांना तिथे राहायचं असेल तर राहू शकतात. पण, परत यायचं असेल तर आमचे दरवाजे नेहमी खुले असतील असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -