Friday, November 22, 2024
HomeबिजनेसShare Market : शेअर बाजारावर विक्रीचा दबाव, सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात

Share Market : शेअर बाजारावर विक्रीचा दबाव, सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला आज ब्रेक लागला. शेअर बाजारातील व्यवहार सुरुवात झाली (Share Market Opening) तेव्हा सेन्सेक्स (Sensex), निफ्टीत (Nifty) घसरण झाल्याचे दिसून आले. जागतिक शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.

आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाली तेव्हा स सेन्सेक्समध्ये 66.40 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स निर्देशांक 58,049 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 29.90 अंकांच्या घसरणीसह 17,310.15 अंकांवर खुला झाला. त्यानंतर नफावसुलीमुळे विक्रीचा दबाव वाढू लागल्याने सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकात आणखी घसरण झाली. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 16.16 अंकांच्या घसरणीसह 58,099.34 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 21 अंकांच्या घसरणीसह 17,319.05 अंकावर व्यवहार करत होता.

निफ्टी 50 मधील 34 स्टॉक्सच्या शेअर दरात घसरण दिसून येत
आहे. तर, 16 शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. त्याशिवाय, बँक निफ्टीतही 153 अंकांची घसरण झाली. बँक निफ्टी 37,749 अंकांवर व्यवहार करत होता.

आज आशियाई शेअर बाजारात घसरण झाली. हँगसँग, निक्केई, कोस्पी, तैवान आदी शेअर बाजारात घसरण सुरू आहे. अमेरिका आणि चीनमधील तणाव, महागाई आणि मंदीच्या शक्यतेने ही घसरण झाल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, सोमवारी शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसल्याने सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांक वधारले. सोमवारी सेन्सेक्स निर्देशांक 545.25 अंकांनी वधारला होता. तर, निफ्टीत 181 अंकांनी वधारला. बाजारातील व्यवहार बंद झाले तेव्हा सेन्सेक्स 58,115.50 अंकांवर आणि निफ्टी 17,340.05 अंकांवर बंद झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -