Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगशिरोळ यड्रावकरांचा नव्हे, उल्हासदादांचा मतदारसंघ, आदित्य ठाकरेंचा दावा, जयसिंगपूरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन

शिरोळ यड्रावकरांचा नव्हे, उल्हासदादांचा मतदारसंघ, आदित्य ठाकरेंचा दावा, जयसिंगपूरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन

युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज (दि.२) (todays news latest) कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये दाखल झाली. या शिवसंवाद यात्रेला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवसैनिकांचा प्रतिसाद पाहून आदित्य ठाकरेही भारावून गेले. ही रॅली नाही, तर खूप मोठे स्वागत आहे.

लोक प्रेमाने पुढे येत आहेत. बाल्कनी, खिडकीतून, रस्त्यावर येऊन लोक आशीर्वाद देत आहेत, असे सांगून हा यड्रावकरांचा नव्हे, तर उल्हासदादांचा मतदारसंघ आहे. (todays news latest) मागील वेळेस येथे थोडे पुढे मागे झाले, परंतु यावेळेस येथे शिवसेना पुन्हा निवडून येईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे यांना कोल्हापुरातून जयसिंगपूरमध्ये पोहोचण्यासाठी दीड तासांचा वेळ लागला. रस्त्यावर नागरिकांकडून त्यांचे उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले. त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. रस्त्यावरील गावात आदित्य यांचे स्वागत करण्यात आले.

त्यांनी शिवसैनिकांची, नागरिकांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद स्वीकारले. प्रत्येक ठिकाणी गाडीतून उतरून ते नागरिकांचे पुष्पगुच्छ स्वीकारत होते. आदित्य ठाकरे यांच्या गाडीमागून शेकडो शिवसैनिकांच्या दुचाकी चालल्या होत्या. हातात भगवा झेंडा घेऊन शिवसैनिक सहभागी झाले होते.

या सरकारला महाराष्ट्राला पुढे येऊ द्यायचे नाही. ही गद्दारी जनतेला मान्य नाही. ही गद्दारी मातोश्रीशी नाही, शिवसैनिकांशी नाही, उद्धव ठाकरे यांच्याशी नाही. ही गद्दारी माणुसकीशी आहे. आता या गद्दारांना माफी नाही अशा शब्दात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. आज त्यांची सभा जयसिंगपूर येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. ज्यांना यायचे आहे, त्यांना मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. राज्यात फक्त दोन लोकांचे जम्बो सरकार आहे. हे सरकार गद्दारचे सरकार आहे. बेकायदेशीर आहे. ते कोसळणार म्हणजे कोसळणार, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली आहे .त्यांच्या शिवसंवाद यात्रेला बंडखोरांना धडकी भरावी, असा प्रतिसाद लाभत आहे.आज त्यांची बंडखोर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मतदारसंघात सभा झाली. कोल्हापूर ते सभेचे ठिकाण असलेल्या जयसिंगपूरमध्ये पोहोचण्यासाठी अवघ्या पाऊण तासाची वाट आहे. मात्र, ठिकठिकाणी नागरिकांकडून उस्फूर्तपणे झालेल्या स्वागताने त्यांना जयसिंगपूरमध्ये पोहोचण्यासाठी तब्बल दीड तासांचा अवधी लागला. यावरून त्यांना मिळालेल्या प्रतिसादाची कल्पना येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -