Sunday, July 27, 2025
Homeराजकीय घडामोडीराजकारणात हार-जीत असते, मात्र आता संपवायची भाषा; उद्धव ठाकरेंचे जे. पी. नड्डांना...

राजकारणात हार-जीत असते, मात्र आता संपवायची भाषा; उद्धव ठाकरेंचे जे. पी. नड्डांना उत्तर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवसेना पक्ष संपलेला आहे, असे विधान एका कार्यक्रमात केले होते. या विधानाचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. शिवसैनिकांना संबोधित करताना ते आज (दि.३) बोलत होते. राजकारणात हार -जीत होत असते, मात्र आता संपवायची भाषा केली जात आहे, असे ठाकरे म्हणाले.



महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आपला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. आपली कायदेशीर लढाई सुरूच राहील, असे ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना फोडण्याचे अनेकदा प्रयत्न करण्यात आले. मात्र, अनेक आव्हाने पायदळी तुडवत आम्ही झेंडा रोवला आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -