ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोरोनाकाळात मागील 2 वर्षांमध्ये निर्बंध असल्याने यावर्षी गणेशोत्सव शासन व न्यायालयाच्या नियमांतर्गत साजरा होणार असून यावर्षी श्री गणेशाचं स्वागत मंडळे धुमधडाक्यात करू शकणार आहेत. कारण राज्य सरकारने एक मोठी खुशखबर दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर अखेरच्या 5 दिवसांमध्ये गणेश मंडळांना रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर वाजविण्यास परवानगी असणार आहे. यामुळे यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करता येणार आहे, मात्र कोरोनाचे अनेक व्हेरियंट येत असून त्याविषयक देखील काळजी घेणं गरजेचं आहे. गणेश मंडळे सामाजिक कामे करत आहेत, त्याच पद्धतीने मंडळांनी सामाजिक उपक्रम म्हणून बुस्टर डोस जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. शिवाय दहीहंडी मंडळालाही परवानग्या दिल्या आहेत” असे मुख्यमंत्री शिंदे यांनी काल मंगळवारी (2 ऑगस्ट) रात्री उशीरा स्पष्ट केलं आहे.
दरम्यान गणेशोत्सव काळात कोणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा काम करत असेल तर पोलिस प्रशासन त्यांच्यावर नक्कीच कारवाई करतील. मंडळांना न्यायालयाच्या नियमांचे पालन करून विसर्जन मिरवणूका काढाव्या लागणार आहेत असंही ते म्हणाले.
ब्रेकिंग ; गणेशोत्सवाच्या अखेरच्या पाच दिवसात रात्री बारा वाजेपर्यंत स्पिकर वाजविण्यास परवानगी..
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -