Friday, August 1, 2025
Homeब्रेकिंगऑटो शोरुममवर दरोडा; १५ लाख लंपास

ऑटो शोरुममवर दरोडा; १५ लाख लंपास

ताजी बातमी ऑनलाईन टीम

दुचाकी आणि चारचाकीच्या नामांकित पगारिया ऑटो शोरूममध्ये बुधवारी रात्री दरोडा पडला. पाच दरोडेखोरांनी शटर उचलून काचा फोडल्या आणि दोन तिजोऱ्या लंपास
केल्या. छावणी उड्डाणपुलाजवळ या तिजोऱ्या फोडून १५ लाख रुपये लंपास केले. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघड झाला.



शहरातील अदालत रोडवर बाबा पेट्रोल पंपाजवळ पगारिया शोरुम आहे. बुधवारी रात्री शोरुम बंद केल्यावर रात्री दोन सुरक्षा रक्षक होते. मात्र, पाऊस येत असल्याने दोघे दोन कोपऱ्यात थांबले. ही संधी साधून पाच दरोडेखोर आले. त्यांनी पूर्वेकडील एक शटर उचकटले. आत घुसल्यावर दरोडेखोरांनी तिजोरीकडे मोर्चा वळविला. तेथील बंद काच फोडून दरोडेखोरांनी दोन्ही तिजोऱ्या उचलून नेल्या. या तिजोऱ्या गुरुवारी सकाळी छावणी उड्डाणपुलाखाली नेऊन फोडल्या. घटनास्थळी एसीपी अशोक थोरात, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक कल्याण शेळके, क्रांती चौक ठाण्याचे उपनिरीक्षक विकास खटके यांनी पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज पाहून संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -