मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर हे कर्मचारी चयन आयोग द्वारे २०१७ च्या अनुवाद क्षेत्रातील परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर १६६ व्या क्रमांकावर निवड होऊन सध्या मुंबई सीमाशुल्क म्हणजेच मुंबई कस्टम्स मध्ये अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कवठणी या गावाचे भूमिपुत्र, वय वर्ष 35, एकेकाळी नववी नापास होऊन देखील न खचता सातत्य ठेवून आत्तापर्यंत जवळपास सात शैक्षणिक अर्हता, संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणारा दुर्मिळ अधिकारी, प्रेरणादायी अष्टपैलू व व्याख्याते, ज्यांच्या मनोहर वाणीने प्रेरित होऊन आज कितीतरी विद्यार्थी त्यांच्या व्याख्यानांच्या तसेच सोशल मीडियाच्या समुहांत पाठवत असलेल्या माहितीच्या अनुषंगाने शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरित होऊन प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या व्याख्यानांचे वादळ संपूर्ण कोकणात तसेच महाराष्ट्रात पसरलेले असून वर्षभरात एक-दोन नव्हे तर १०८ विक्रमीय व्याख्यानांची ऐतिहासिक नोंद त्यांच्या नावावर आहे. बरे यासाठी वेळ कसा काढतात हा प्रश्न आपल्या समोर असेल तर स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील वेळ मग शनिवार, रविवार अथवा अन्य शासकीय सुट्टी असेल तरी समाज प्रबोधनासाठी व्यतीत केले जातात. स्वतः अधिकारी झाले तरी ग्रामीण भागातील व अन्य क्षेत्रातील गरजवंत विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी बनावेत यासाठी त्यांची तिमिरातुनी तेजाकडे नामक शैक्षणिक चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात पसंतीचा उपक्रम ठरली आहे. रेडकर सरांचे वैशिष्ट्य म्हणजे व्याख्यानासाठी एकही रुपया मानधन किंवा कोणत्याही स्वरूपाचा प्रवासभत्ता सुद्धा घेत नाहीत, राहण्यासाठी विशिष्ट सोय सुद्धा करावी लागत नाही, व्याख्यानाचे स्थळ मंदिर, मैदान, जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालयांचे सभागृह कोठेही असते. फक्त समोर विद्यार्थी व हातात एक माईक एवढीच माफक अपेक्षा. अधिकारी झाल्यानंतर वास्तविक कृतीद्वारे अधिकारी घडवण्यासाठी प्रयत्नशील असणारे रेडकर सर.
रेडकर सरांचा कोणताही क्लास अथवा अकॅडमी नाही, एकही रुपया मानधन अथवा प्रवास भत्ता न घेणारा, स्वतःच्या वेतना मधून सामाजिक कार्य करणारे, स्वतःच्या कुटुंबाला कमी वेळ देऊन समाजासाठी शैक्षणिक चळवळ राबविणारे माननीय श्री सत्यवान यशवंत रेडकर सर हे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे ‘प्रशासकीय स्वराज्य’ व “शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव” निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
लवकरच कोल्हापूर मध्ये निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यान घेण्याबाबत त्यांनी घोषणा केली आहे त्यामुळे लवकरच कोल्हापूर मधील विद्यार्थ्यांना त्यांच्या या अनमोल मार्गदर्शनाचा लाभ होऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनुभूती प्राप्त होईल. आपण श्री. सत्यवान यशवंत रेडकर सर यांना व्हाट्सअप वर 9969657820 या क्रमांकावर संपर्कात राहू शकता व लिंक प्राप्त करून त्यांच्या समूहात समाविष्ट होऊ शकता.