Thursday, November 7, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर: भरदिवसा मोटार फोडून ७ तोळे दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास

कोल्हापूर: भरदिवसा मोटार फोडून ७ तोळे दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास

मध्यवर्ती आणि नेहमी गजबजलेल्या भाऊसिंगजी रोडवर करवीर पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर रस्त्यावर पार्किंगमधील आलिशान कार चोरट्यांनी शनिवारी भरदिवसा फोडली. सात तोळ्यांचे दागिने लॅपटॉप असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज हातोहात लंपास केला. उंदरवाडी (तालुका कागल) येथील विनायक लक्ष्मण गौंड यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सराईत टोळीतील पाच संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

विनायक गौंड नातेवाईकांसमवेत आज शनिवारी दुपारी मोटारीतून कोल्हापुरात आले होते. शनिवार पेठ येथील वकिलांकडे जाण्यापूर्वी त्यांनी भाऊसिंगजी रोडवर करवीर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारापासून अवघ्या काही अंतरावर रस्त्याच्या एका बाजूला आपली कार पार्क केली. सराईत टोळीने मोटारीच्या उजव्या बाजूची काच फोडून मागील सीटवरील सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असलेली बॅग हातोहात लंपास केला. थोड्या वेळानंतर हा प्रकार निदर्शनास आला.

भाऊसिंगजी रोडवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेण्यात आला. २५ ते ३५ वयोगटातील पाच जणांच्या टोळीने चोरी केल्याचे उघडकीला आले आहे. पोलीस निरीक्षक संतोष जाधव, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार संजय कोळी आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांचे दोन पथके ठिकाणी रवाना झाले आहेत. शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या परिसरात भरदिवसा हा प्रकार घडल्याने पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -