सिने स्टाईलने दुचाकीवरून सवारी करत मलकापूर शहरातील विविध चौकाबरोबरच कॉलेज परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र साळुखे, पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
मलकापूर शहरातील निर्जन ठिकाणा बरोबरच चौका चौकातही आणि कॉलेज परिसरात कॉलेज भरताना आणि कॉलेज सुटतेवेळी दुचाकी सवारी करत अनेक हुल्लडबाज तरुण धुमाकूळ घालत आहेत. या पार्श्वभूमीवर निर्भया पथकाने अशा हुल्लडबाज तरुणांच्यावर कारवाईचा बडगा उगारून त्यांना चांगलाच पोलिसी खात्या दाखवला आहे. यापुढेही अशाच हुल्लडबाज तरुणांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता चांगलीच मोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने आता विशेष लक्ष देऊन कॉलेज भरतेवेळी व कॉलेज सुटतेवेळी कॉलेज परिसरात मलकापूर शहरातील मंदिर चौक या ठिकाणीही भेट देऊन अशा तरुणांबरोबरच युवतींनाही समज देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून पुढे येऊ लागली आहे.
निर्भया पथकात महिला पोलीस कॉन्स्टेबल आमटे, पोलीस कॉन्स्टेबल कानुगडे, सुयश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल बाद पोलीस कॉन्स्टेबल पाटील, होम गार्ड व्हटाळे, पाटील, केसरे, आदीच्या पथकाने सहभाग घेतला.