Sunday, August 3, 2025
Homeक्रीडापुन्हा रंगणार टी-20 चा थरार, मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ जाहीर..

पुन्हा रंगणार टी-20 चा थरार, मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ जाहीर..

मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा एमआय एमिरेट्स संघ (Mumbai Indians Emirates) युएईमध्ये होत असलेल्या टी-20 लीगमध्ये (UAE T-20 League) सहभागी होणार आहे. चाहत्यांसाठी ही मोठी खुशखबर असणार आहे. मुंबई इंडियन्स फ्रॅंचायजीचा भाग MI केपटाऊन आणि MI एमिरेट्सचा संघ असणार आहे.

मुंबई इंडियन्स फ्रॅंचायजीचा MI एमिरेट्स (MI Emirates) युएईमध्ये होणाऱ्या T-20 लीगमध्ये सहभाग घेणार आहे. या संघाने त्यांच्या संघामध्ये 14 खेळाडू सामील केल्याची घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सच्या एमिरेट्सच्या टीमने आतापर्यंत 14 खेळाडूंचा समावेश करुन घेतला आहे. यामध्ये चार खेळाडू वेस्ट इंडिजचे आहेत. तर तीन खेळाडू इंग्लंडचे, तीन अफगानिस्तान, एक स्कॉटलॅंड, एक नेदरलॅंड, एक-एक खेळाडू दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंडचा सामील केला आहे.

कायरन पोलार्ड (वेस्टइंडीज)
ड्वेन ब्राव्हो (वेस्टइंडिज)
निकोलस पूरन (वेस्टइंडिज)
ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड)
आंद्रे फ्लेचर (वेस्टइंडिज)
इम्रान ताहिर ( दक्षिण आफ्रिका )
समित पटेल (इंग्लंड)
विल स्मीड (इंग्लंड)
जॉर्डन थॉम्पसन (इंग्लंड)
नजीबुल्लाह जादरान (अफगानिस्तान)
जहीर खान (अफगानिस्तान)
फजलहक फारुकी (अफगानिस्तान)
ब्रेडली व्हील (स्कॉटलॅंड)
बैस डे लीडे (नेदरलॅंड्स)

दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण आफ्रिकन लीगसाठी एमआय केपटाऊन (Mumbai Indians Cape Town) संघासोबतही 5 खेळाडू मुंबई इंडियन्सच्या फ्रॅंचायजीकडून करारबद्ध झाले आहेत. त्यात अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर राशिद खान, इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन तर दक्षिण आफ्रिकेचे कागिसो रबाडा आणि डेवाल्ड ब्रेविस यांचा संघात समावेश आहे.

लखनौ फ्रेंचाइजीनेही पाच खेळाडू केले करारबद्ध:

दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगसाठी लखनौ फ्रेंचाइजीने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डी कॉकसह काही खेळाडूंना करारबद्ध केलंय. यात क्विंटन डी कॉकसह जेसन होल्डर, केयली मेयर्स, रीसी टॉपले आणि प्रेनेलन सुब्रेयन यांची नावं आहेत. विशेष म्हणजे क्विंटन डी कॉक आणि जेसन होल्डर हे खेळाडू आयपीएलमध्ये लखनौ सुपर जॉयंट्स संघात खेळतात. मुंबई, लखनौ सुपर जायंट्सशिवाय चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि दिल्लीचे सहमालक जेएसडब्ल्यूने अशा आयपीएलच्या 6 फ्रेंचायजींनी दक्षिण आफ्रिका टी-20 लीग मध्ये संघ विकत घेतले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -