Wednesday, August 6, 2025
Homeक्रीडाधनश्रीला घटस्फोट दिल्याच्या चर्चांवर अखेर Yuzvendra Chahal ने सोडलं मौन, म्हणाला -...

धनश्रीला घटस्फोट दिल्याच्या चर्चांवर अखेर Yuzvendra Chahal ने सोडलं मौन, म्हणाला – ‘….हे सगळं थांबवा’

ताजी बातमी ऑनलाईन टीम

टीम इंडियाचा स्पिनर युजवेंद्र चहल सध्या आपल्या पर्सनल लाईफमुळे चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात घटस्फोट झाल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. दोघांमध्ये काही तरी झाले असून लवकरच ते घटस्फोट घेण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा केली जात आहे. धनश्री यांच्यात बिनसलं असून ते घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचे अंदाज लावले जात आहेत. पण या चर्चांनंतर आता युजवेंद्र चहल याने मौन सोडले आहे. युजवेंद्रने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत सोशल मीडियांवरील बातम्यांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे.


युजवेंद्र चहलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने असे म्हटले आहे की, ‘“तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की आमच्या नात्यातील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. हे सगळं थांबवा. सर्वांना खूप सारे प्रेम.’ सध्या युजवेंद्रची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -