Wednesday, August 6, 2025
Homeब्रेकिंगतेजस उद्धव ठाकरे, ठाकरे घराण्यातील युवाशक्तीचा नवा चेहरा, पोस्टर झळकले

तेजस उद्धव ठाकरे, ठाकरे घराण्यातील युवाशक्तीचा नवा चेहरा, पोस्टर झळकले

मागच्या दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेतून बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत सत्ता स्थापन केली. यामुळे शिवसेनेतील मोठी बंडाळी समोर आली. (Shiv sena Tejas Thackeray) यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदार आणि खासदारांचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान उद्धव ठाकरे यांचे दोन नंबरचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशाची जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता आदित्य ठाकरे यांच्यानंतर तेजस ठाकरे यांचे पाठबळ लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. यापूर्वी मागच्या महिन्यात तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त मुंबईत जोरदार पोश्टरबाजी केली होती. यानंतर आता दहिहंडीनिमीत्त तेजस यांचे युवाशक्ती म्हणून पोश्टर दिसून येत आहेत. यामुळे तेजस ठाकरे यांच्यारुपाने ठाकरे घराण्यातील नवीन एक राजकारणी तयार होणार अशी चर्चा रंगली आहे.

मुंबईतील दहीहंडी उत्सवानिमित्त तेजस ठाकरे यांचे राजकीय लाँचिंग करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यामुळेच मुंबईतील गिरगाव येथील दहीहंडी कार्यक्रमाकरिता शिवसेनेतर्फे लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर तेजस ठाकरे यांचेही फोटो झळकत आहेत. युवा नेतृत्व आदित्य ठाकरे तर युवा शक्ती म्हणून तेजस ठाकरे यांचे पोस्टर्स गिरगावात लावण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेतील बंडाळी मोडून काढत, शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेचे ढासळलेला बुरूज पुन्हा उभारण्यासाठी उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे थेट मैदानात उतरले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते मुंबईसह राज्यभरात शिवसैनिकांचे मेळावे घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींतून पक्षसंघटन वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरेदेखील काही दिवसातच महाराष्ट्रभर दौरे काढणार आहेत. या सर्व प्रयत्नांमध्ये उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हे राजकारणात कधी उतरतात याकडे मुंबई आणि महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. पार्श्वभूमीवर तेजस ठाकरे यांना राजकीय मैदानात उतरवण्याची पूर्ण तयारी ठाकरेंनी केलेली दिसून येते.

तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील एंट्रीचा विषय येतो तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका वाक्याचा नेहमीच उल्लेख केला जातो. ”उद्धवचा नंबर दोनचा मुलगा माझ्यासारखाच सेम आहे. त्याच्या आवडीनिवडी माझ्याशी जुळतात. असे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या भाषणात जाहीर केले होते. तेजस ठाकरे हे विविध देशांतील जंगलांमध्ये प्राण्यांवर तसेच जैव विविधतेवर संशोधन करत आहेत. आता आदित्य ठाकरेंच्या बरोबरीने ते राजकारणात उतरतील अशी शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -