Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : शिवसेनेच्या भगवी दहीहंडीचा शिरोळचा 'अजिंक्यतारा' मानकरी

कोल्हापूर : शिवसेनेच्या भगवी दहीहंडीचा शिरोळचा ‘अजिंक्यतारा’ मानकरी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बांधण्यात आलेल्या शिवसेनेची ‘भगवी’ दहीहंडी शिरोळच्या अजिंक्यतारा गोविंदा पथकाने फोडली. 32 फुटांवरील दहीहंडी फोडून हे पथक दीड लाख रुपये बक्षिसाचे मानकरी ठरले. सहाव्या थरावरून अफताब कुरणे या गोपाळाने हंडी फोडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणाईने एकच जल्लोष केला. सलग तिसऱ्या वर्षी अजिंक्यतारा पथकाने ही दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. या सोहळ्यासाठी 94.3 टोमॅटो एफएम मीडिया पार्टनर होते.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना व छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळ यांच्या वतीने दहीहंडी करण्यात आली होती. ऋतुराज क्षीरसागर व पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते बक्षिसाची रक्कम अजिंक्यतारा पथकाला देण्यात आली. दहीहंडीसाठी आबालवृद्धांची मोठी गर्दी झाली होती. रंगीबेरंगी आकर्षक लाईटस्, डॉल्बीचा दणदणाटात तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. सलामीनंतर पहिल्याच प्रयत्नात अजिंक्यतारा गोविंदा पथकाने हंडी फोडली. मंडळाचे अध्यक्ष राहुल अपराध यांनी स्वागत केले. शिवसेना शाखाप्रमुख कपिल केसरकर यांनी आभार मानले. केदार भुर्के, मंडळाचे उपाध्यक्ष अवधूत अपराध, सोहेल बागवान, शाहरूख बागवान, मयूर देसाई, रूपेश डोईफोडे यांनी संयोजन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -