ताजी बातमी ऑनलाईन टीम
पन्हाळा; पन्हाळगडावरील ऐतिहासिक राजदिंडीवरील बुरुज आज (दि.२१) ढासळला. पन्हाळगडावरील तटबंदी, बुरुज कोसळत असून सकाळी राजदिंडीवर असणारा बुरुजाची खालच्या बाजूने पडझड झाली आहे. तटबंदी दोन वर्षापूर्वीच ढासळली होती. तेव्हापासून हा रस्ता धोकादायक असल्याने वन खात्याने बंद केला आहे.
या रस्त्यावर राजदिंडीखाली असणाऱ्या शेतावर शेतकरी ये-जा करत असतात. आज या बुरुजाची पडझड झाल्यानंतर वन विभाग व पुरातत्व विभागाने पाहणी केली. हा रस्ता पूर्ण धोकादायक असल्याने या ठिकाणच्या तटबंदीवर कोणीही जाऊ नये, असे पुरातत्व विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. तर राजदिंडीजवळील रस्ता पूर्ण धोकादायक बनला आहे. या रस्त्याने कोणीही जाऊ नये, असे आवाहन वनपाल विजय दाते यांनी केले आहे.
कोल्हापूर : पन्हाळा येथील राजदिंडीवरील बुरुज ढासळला
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -