Friday, August 1, 2025
Homeतंत्रज्ञानरॉयल एनफिल्डची जबरदस्त ऑफर ! फक्त 9,000 रुपयांत घरी आणा नवीन बुलेट

रॉयल एनफिल्डची जबरदस्त ऑफर ! फक्त 9,000 रुपयांत घरी आणा नवीन बुलेट

ताजी बातमी ऑनलाईन टीम

टू-व्हीलर निर्मितीमध्ये प्रसिद्ध असलेल्या रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) कंपनीने ग्राहकांसाठी एक जबरदस्त स्कीम आणली आहे. रॉयल एनफिल्ड आपल्या दमदार बाईक्स आणि स्कीममुळे कायम चर्चेत असते. देशात रॉयल एनफिल्डचा एक विशेष चाहता वर्ग आहे. त्यानुसार देशात कंपनीची 350cc बाईक सर्वाधिक विकली जाते. रेट्रो डिझाईन आणि उत्तम लुकमुळे कंपनीच्या बाईक्स लाखो लोकांच्या पसंतीस उतरल्या आहे. सध्या रॉयल एनफिल्डच्या बाईक्सची मोठ्या प्रमाणात विक्रीही होते. अशात कंपनीने ग्राहकांसाठी एक जबरदस्त स्कीम (Royal Enfield Finance Scheme) आणली आहे. जाणून घेऊया कंपनीच्या नवीन स्कीम विषयी अधिक माहिती…



रॉयल एनफिल्डच्या बाईक्स ह्या किमतीच्या बाबतीत इतर बाईक्सच्या तुलनेत थोड्या महाग असतात. यामुळे इच्छा असूनही अनेकांना या बाईक्स खरेदी करता येत नाही. ही बाब लक्षात घेत अशा लोकांसाठी रॉयल एनफिल्डने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत आता तुम्ही फक्त 9 हजार रुपये देऊन नवीन बुलेट घरी आणू शकता.

फायनान्स स्कीम
ग्राहकांसाठी कंपनीने एक फायनान्स स्कीम आणली आहे, ज्यानुसार कंपनीच्या विविध मॉडेल्सवर डाउन पेमेंट आणि ईएमआयची सुविधा दिली जात आहे. यामध्ये रॉयल एनफील्ड बुलेट 350 वर सर्वात कमी डाउन पेमेंट करता येते, जे फक्त 9000 रुपयांचा आहे. हा डाउन पेमेंट भरून तुम्ही नवीन बुलेट घरी घेऊन येऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -