Saturday, August 2, 2025
Homeसांगलीअथणी मिरज ; कॉलेजबसला टेंपोची समोरासमोर धडक; २ जणांचा जागीच मृत्यू; २०...

अथणी मिरज ; कॉलेजबसला टेंपोची समोरासमोर धडक; २ जणांचा जागीच मृत्यू; २० विद्यार्थी गंभीर जखमी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर – बेळगाव जिल्ह्यातील अथणी-मिरज रोडवर टेम्पो व कॉलेज बसची मोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार तर 20 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. या अपघातातील जखमी झालेले अनेक विद्यार्थी गंभीर जखमी असून ते अकरावी आणि बारावीच्या वर्गात शिकत होते.



सकाळी कॉलेजवर विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना हा के अपघात झाला आहे. टेंपोने स्कुल बसला दिलेली धडक इतकी भयानक होती, की, दोन्हीही वाहानातील चालक, जागीच ठार झाले असून बसमधील ड्रायव्हरच्या केबिनम बसलेले विद्यार्थी आणि शिक्षक गंभीर जखमी झाले आहे कॉलेजबसच्या केबिनमध्ये बसलेल्या एका शिक्षकाचा हात आणि पायही तुटला असून शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे हा अपघात घडला असून अपघातानंतर काही वेळातच त्याठिकाणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -