अग्नीवीर होण्याची तयारी करणाऱ्या तरुणींची प्रतीक्षा आता संपली आहे. भारतीय लष्कराने महिला अग्निवीर भरतीसाठी (Indian Army Agniveer Recruitment 2022) अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत इच्छक आणि पात्र उमेदवार भारतीय लष्कराची (Indian Army) अधिकृत वेबसाईट Joinindianarmy.nic.in
ला भेट देऊन अर्ज करु शकतात.
या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. 7 सप्टेंबर 2022 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्यापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायाच आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना वाचावी.
अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 7 सप्टेंबर 2022
भरती मोहिमेचे प्रवेशपत्र मिळण्याची तारीख – 12 ते 13 ऑक्टोबर 2022 (उमेदवारांना त्यांच्या ईमेलवर पाठवले जाईल)
Indian Army Agniveer Recruitment 2022:
शैक्षणिक पात्रता –
या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराने दहावी परीक्षेतील प्रत्येक विषयात किमान 45 टक्के आणि 33 टक्के गुण मिळवलेले असावे.
वयोमर्यादा –
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 ते 23 वर्षांदरम्यान असावे.
असा अर्ज करा –
– अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वातआधी Joinindianarmy.nic.in
या अधिकृत साइटवर जा.
– होमपेजवर दिलेल्या अग्निपथ विभागावर क्लिक करा.
– त्यानंतर ऑनलाइन अर्ज करा वर क्लिक करा.
– उमेदवाराने ईमेल आयडी टाकून नोंदणी करावी.
– आता अर्ज प्रक्रिया सुरू होईल
– उमेदवारांने आवश्यक तपशील आणि कागदपत्रे अपलोड करावीत.
– त्यानंतर फॉर्म सबमिट करा.
– फॉर्मची प्रिंट आउट काढून घ्यायला विसरु नका.