भारतीय लष्करात नोकरीची तयारी करीत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्याच्या ’10+2 Technical Entry Scheme (TES) – 48′ अंतर्गत लवकरच 90 पदांसाठी भरती होत आहे. विशेष म्हणजे, ही पदभरती ‘जेईई मेन्स’ (JEE Mains) च्या मार्कांच्या आधारावर केली जाणार आहे.
याबाबत लष्कराने (Indian Army) अधिसूचना जारी केली आहे.. त्यानुसार, एकूण 90 रिक्त जागांवर ही भरती होत असली, तरी ती तात्पुरती असणार आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण अकादमीतील प्रशिक्षण क्षमतेनुसार बदलले जाऊ शकते. चार वर्षांचा हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर, कॅडेट्सना लष्करात ‘लेफ्टनंट’ पदावर कायमस्वरूपी संधी मिळू शकते.
शैक्षणिक पात्रता
पात्र उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळांकडून PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित) मध्ये 10+2 परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष किमान एकूण 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा.
विविध राज्य/केंद्रीय बोर्डांच्या ‘पीसीएम’ टक्केवारीची गणना करण्यासाठी पात्रता अट केवळ बारावीला मिळालेल्या गुणांवर आधारित असेल.
उमेदवाराने ‘जेईई मेन्स’ परीक्षा दिलेली असावी.
वयोमर्यादा – 16 ते 19 वर्षे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड कामगिरीच्या आधारे दोन टप्प्यांत होईल. निवड झालेल्या व्यक्तींना मुलाखतीसाठी बोलावले जाईल, तसेच नंतर मेडिकल टेस्ट केली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी प्री-कमिशनिंग ट्रेनिंगसाठी इंडक्शन करण्यापूर्वी डायरेक्टरेट जनरल ऑफ रिक्रूटिंग वेबसाइट www.joinindianarmy.nic.in
वर पब्लिश केली जाईल.
नोंदणी प्रक्रिया सुरु तारीख – 22 ऑगस्ट 2022
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – 21 सप्टेंबर 2022
असा करा अर्ज
सुरुवातीला www.joinindianarmy.nic.in
या अधिकृत साइटवर जा
होमपेजवर ‘Apply Online’ लिंकवर क्लिक करा.
‘TES-48’ प्रवेश योजनेसाठी नोंदणी करा.
अर्जात विचारलेली माहिती भरा व अर्ज फी भरुन फॉर्म सबमिट करा.
फॉर्म डाउनलोड करा व भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट काढावी.