करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसराचे चित्र अक्षरश: विदारक (Disruptive) बनले आहे. स्वच्छतागृहांचा अभाव, कचर्याचे ढीग आणि चिखल, डबक्यांनी परिसर अक्षरश: व्यापला आहे. यामुळे निर्माण होणार्या दुर्गंधीचा नाहक त्रास पर्यटकांसह स्थानिकांनाही सहन करावा लागत आहे. ‘शाहूनगरी’सह अंबाबाईदेवीच्या दर्शनासाठी वर्षभर लाखोंच्या संख्येने भाविक कोल्हापुरात येतात; मात्र या पर्यटकांना मंदिर परिसराला अवकळा आल्याचे चित्र पाहावे लागत आहे.
परिसराचे चित्र अस्वच्छतेमुळे अक्षरश: विदारक (Disruptive) बनले आहे. सभोवतालच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यात पाण्याची डबकी साठली आहेत. वाहून आलेल्या मातीमुळे ठिकठिकाणी अनेक दिवसांपासून चिखू साठून राहिल्याने त्यावर शेवाळ निर्माण झाले आहे. जागोजागी खरमातीचा ढीग, विविध प्रकारच्या कचर्याचे ढीग साठत असल्याने डास- माश्या यांचा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यापीठ हायस्कूलकडील दक्षिण प्रवेशद्वाराजवळ महापालिकेच्या वतीने स्वच्छतागृहे व शौचालये बांधण्यात आली होती.
रोटरी क्लबच्या वतीने नव्याने स्वच्छतागृहे बांधण्याची घोषणा झाल्याने तीची पूर्तता व्हायच्या आतच मनपाकडून स्वच्छतागृहे व शौचालये पाडण्यात आली आहेत. पर्याय म्हणून या परिसरात ठेवण्यात आलेले फिरत्या स्वच्छतागृहाचीही अवस्था दयनीय आहे.