राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. दरम्यान शिंदे गट (Shinde group) आणि ठाकरे गटातील शिवसैनिकांमध्ये देखील चकमकी होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी भाजप पक्षावर हल्ला केला आहे. भाजप (BJP) राष्ट्रीय पक्ष आहे की, चोरबाजार असा बोचरा सवाल त्यांनी केला आहे. यासोबतच एकनाथ शिंदेंवर (Eknath shinde) देखील खोचक टिका त्यांनी केली आहे. मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियनचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम बुधवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी ही टीका केली आहे.
दुसऱ्यांचे नेते चोरण्याचे काम सुरु
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिवसेना आणि भाजप तसेच शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिंदे गटाकून ठाकरे गटावर विविध आरोप केले जात आहेत. आता थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपकडून दुसऱ्या पक्षांमधील आमदार, खासदार आणि नेते चोरुण नेण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. हा राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार असा सवाल त्यांनी केला आहे.
भाजपला ठाकरेंचे प्रत्युत्तर
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपला सत्तापिपासून प्रमाणे मुंबई मिळवण्याची हाव लागली आहे. ज्या पक्षाला आचारविचार काहीही नाही. मात्र, मराठी माणूस ती इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. तसेच कोरोना काळात मुख्यमंत्री घरीच थांबले होते या भाजपच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप म्हणते की, मी आत्ममग्न राहिलो होतो. तर होय मी आत्ममग्न राहिलो होतो. कारण महाराष्ट्र हा माझा आत्मा आहे. कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी आत्ममग्न होतो आणि भविष्यात देखील राहील असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे हे कंत्राटी मुख्यमंत्री
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील कंज्ञाटी वीज कामगारांच्या प्रश्नाचा संदर्भ देत असताना मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंवर टिका केली. ते म्हणाले की, कंत्राटी कामगारांप्रमाणे राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री हे देखील कंत्राटी आहेत. ते या पदावर किती वेळ राहणार हे त्यांनाच माहीत नाही. तसेच राज्यात सध्या दोन चाकी ‘ईडी’ सरकार चालले असल्याचा टोला द्यांनी लगावला आहे.