Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानआता घरबसल्या पॅन कार्डमध्ये करू शकता दुरुस्ती, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?

आता घरबसल्या पॅन कार्डमध्ये करू शकता दुरुस्ती, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?

आपल्याजवळ असलेल्या सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड देखील असते. बँक खाते उघडण्यासाठी, पीएफ खात्यासाठी अर्ज करण्यासाठी, कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, तुमचा सिबिल स्कोअर तपासण्यासाठी आणि आयकर रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते. तुम्ही बँक खात्यात स्लिपद्वारे 50 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा केली तरी तुम्हाला पॅन कार्ड आवश्यक असते. त्यामुळे पॅनकार्डची गरज लक्षात घेऊन प्रत्येकजण ते बनवून घेतो. तुमच्या पॅन कार्डमध्ये तुमचे नाव किंवा इतर कोणतीही चूक असेल किंवा तुम्हाला त्यात काही बदल करायचा असेल तर तो कसा करता येईल हे समजून घेऊया…

ऑफलाईन पॅन कार्ड दुरुस्ती


तुमच्या पॅन कार्डमध्ये काही चूक असल्यास तुम्ही ती दुरुस्त करू शकता. तुम्ही ही दुरुस्ती ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे करू शकता. तुमच्या पॅन कार्डमध्ये ऑफलाइन मोडमध्ये दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पॅन सुविधा केंद्रावर जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मला ‘नवीन पॅन कार्ड/पॅन डेटामध्ये बदल/करेक्शनसाठी अर्ज’ असे म्हणतात. यानंतर तुमच्या पॅन कार्डमध्ये दुरुस्ती केली जाईल.

ऑनलाइन पॅन कार्ड दुरुस्ती (Online PAN Card Correction)
याशिवाय तुम्ही ऑनलाइन देखईल पॅन कार्डमध्ये दुरुस्ती करू शकता. तुम्हाला तुमचे पॅन कार्ड ऑनलाइन अपटेड करायचे असेल तर तुम्ही NSDL सेवा onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html

किंवा UTITS सेवा UTIITSL myutiitsl.com/PAN_ONLINE/CSFPANAapp

ला भेट देऊन ते करू शकता.

येथे संपर्क देखील करू शकता (PAN Card Correction Contact)
तुम्ही NSDL शी 1800-180-1961 आणि 020-27218080 या क्रमांकांवर संपर्क साधू शकता. याशिवाय efilingwebmanager@incometax.gov.in आणि tininfo@nsdl.co.in या दोन आयडींवर तुम्ही त्यांना ईमेल देखील लिहू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -