मिरजेतील गणेशोत्सव हा सण पश्चिम महाराष्ट्रातील आणि उत्तर कर्नाटकातील मोठा उत्सव असतो.यामध्ये मिरजेत ३५० ते ४०० गणेशोत्सव मंडळ आहेत.या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मनीषा दुबुले मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
यामध्ये गणेशोत्सव साजरा करणेबाबत पुर्व तयारी तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि प्रशासकीय विभागाने जी पूर्व तयारी केली आहे यांचा आढावा तसेच मंडळांना सुचना याबाबत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.यामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये गणेश मूर्ती विक्री स्टाॅल कोणत्या ठिकाणी लागेल.तसेच रोडवर च्या खड्ड्याबाबत,विजेच्या तारा, विसर्जन कुंड,मुर्ती दान केंद्र,गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी गणेश तलाव येथे बोट,तराजू इत्यादी गोष्टींची यामध्ये चर्चा झाली.तसेच पोलिस प्रशासनाकडून मिरज करांना आवाहन करण्यात आले आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये.तसेच सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट करु नये,यासाठी ही बैठक पार पडली.तसेच मिरज उपविभागीय अधिकारी अशोक विरकर साहेब यांनी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या मिरजकरांना शुभेच्छा दिल्या.