Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरमग्रूर रावणामुळे रामायण घडले, खासदार धनंजय महाडिकांचा बंटी पाटलांना टोला

मग्रूर रावणामुळे रामायण घडले, खासदार धनंजय महाडिकांचा बंटी पाटलांना टोला

ताजी बातमी ऑनलाईन टीम

रावणला सत्तेचा उन्माद होता. तो मग्रूर होता. त्याने सीतेचे हरण केले. त्यामुळे रामायण घडले. रामायणातील राम हा एकवचणी एक पत्नी होता. त्यामुळे स्वतःला रामायणातील मयूर रावण समजतात का? असा घणाघात खासदार धनंजय महाडिक यांनी माजी पालकमंत्री यांचे नाव न घेता केला. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच सत्ताधाऱ्यांच्या उन्मादामुळे गोकुळ दूध संघ अडचणीत आला असून त्याची वाटचाल शेतकरी संघाच्या दिशेने होत असल्याची टीकाही यावेळी महाडिक यांनी केली.


गोकुळ दूध संघाची वाटचाल शेतकरी संघाकडे गोकुळ दूध संघातील सत्ताधाऱ्यांच्या मनमानीमुळे दूध संघ भयानक परिस्थितीकडे जात आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतःचे सभासद पुढे आणण्यासाठी नवीन संस्थांची नोंदणी केली आहे. असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळ सत्ताधाऱ्यांवर केला. ज्या साडेचारशे संस्था नव्याने उभ्या केल्या आहेत, त्या संस्था जागेवर नाहीत. केवळ निवडणुकीच्या मतदानासाठी हे जर नवीन संस्था उभारत असतील तर ते करू नये, असा सल्लाही खासदार महाडिक यांनी दिला.

गोकुळ दूध संघामध्ये अनेक बाहेरून संस्थांकडून वासाचे दूध घेतले जाते. ते वासाचे दूध त्या संस्थांना परत दिले जावे. अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोन्याने मढवतो अशी भाषा केली होती. गेल्या वर्षभरात किती दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोन्याने मढवले याचे उत्तर ही सत्ताधाऱ्यांनी द्यावे. असे खासदार महाडिक म्हणाले.

सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे गोकुळ दूध संघाची वाटचाल आता शेतकरी संघाकडे चालली आहे. असा घणाघात आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला. दरम्यान सोमवार 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभेला मी उपस्थित राहणार असल्याचेही खासदार महाडिक यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -