ताजी बातमी ऑनलाईन टीम
जगातील एक तृतीयांश मृत्यू हृदयविकारामुळे होतात. आपण जे खातो किंवा पितो त्याचा आपल्या हृदयाच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहेत आणि त्यांच्यापासून दूर राहून आपण हृदयाशी संबंधित अनेक आजारांना दूर ठेवू शकतो. याच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब वाढलेले कोलेस्ट्रॉल जळजळ यासारख्या समस्या उद्भवतात, ज्या हृदयासाठी अत्यंत धोकादायक असतात. जर तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर ते तुमचा हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका (Heart Attack) यासारख्या समस्यांपासून बचाव करु शकते. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
फ्रेश हर्ब जर तुम्ही तुमच्या आहारात ताज्या औषधी वनस्पतींचा समावेश केलात तर तुमचे हृदय निरोगी ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. यामुळे तुमचं जेवणही चविष्ट होईल.
ब्लॅक बीन्स फॉलेट, मॅग्नेशियम आणि अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असलेले ब्लॅक बीन्स हृदयाला निरोगी ठेवण्यास खूप मदत करतात. हे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते.
सॅल्मन फिश
ओमेगा 3 ने समृद्ध सॅल्मन हृदयाला निरोगी ठेवते आणि रक्तदाबाच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.
ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइलमध्ये हेल्दी फॅट आढळते आणि त्यात अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे रक्तवाहिन्यांचे संरक्षण करण्यास मदत करते.
अक्रोड
अक्रोड हृदयाच्या आर्टरीला संरक्षण करण्यास आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
बदाम
बदामाच्या सेवनाने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येते. यामध्ये भरपूर फायबर असतात.
स्वीट पोटॅटो
तुम्ही हे बटाट्यासोबत रिप्लेस करु शकता. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्यात मदत मिळते. ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.
(टीप : लेखात दिलेला सल्ला ही सामान्य आणि उपलब्ध माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)