Sunday, July 6, 2025
Homeअध्यात्मगणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन

गणपती बाप्पा मोरया….मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गणेशभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते तो गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi 2022) दिवस आज आहे. आज घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. गणपती बाप्पा मोरया….मंगलमूर्ती मोरया….अशा जयघोषात बाप्पाला घरी आणले जात आहे. लाडक्या बाप्पाला (Ganpati Bappa) आणण्यासाठी सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. खरं तर मोठ्या गणेशोत्सव मंडळाचे गणपती दोन दिवसांपूर्वीच आले. घरगुती गणपतीचे आगमन देखील कालपासून सुरु होते. आजही अनेक जण आपल्या घरी बाप्पाला घेऊन येत आहे. सगळीकडे ढोल-ताशाचा गजर ऐकू येत आहे. बाप्पाच्या आगमनाने घराघरात मंगलमय आणि भक्तीमय वातावरण आहे. आकर्षक सजावट, बाप्पासाठी नैवेद्य आणि पूजा-आरत्याचे स्वर पुढचे दहा दिवस सगळीकडे ऐकायला मिळणार आहेत. मुंबईसह राज्यातील गणेश चतुर्थीचे अपडेट पाहा एका क्लिकवर….

गणेश चतुर्थीनिमित्त नागपूरातील प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरामध्ये सकाळी आरती करण्यात आली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्याच्या घरी आणि वर्षा बंगल्यावर बाप्पाचे आगमन होणार
– मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन होणार
– ठाण्याच्या घरी दीड दिवसांचा बाप्पा विराजमान होणार
– तर वर्षा बंगल्यावर 10 दिवसीय गणपती बाप्पाचे आगमन होणार
– येणाऱ्या काळात वर्षावर फक्त मुख्यमंत्र्यांचे प्रशासकीय कामकाज चालणार
– तर मुख्यमंत्री नंदनवन या बंगल्यावरच राहणार

गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -