Saturday, July 5, 2025
Homeमहाराष्ट्रगणेशोत्सवावर सीसीटीव्हीची नजर, 300 कॅमेरे करणार 'या' प्रमुख मंडळांना कव्हर

गणेशोत्सवावर सीसीटीव्हीची नजर, 300 कॅमेरे करणार ‘या’ प्रमुख मंडळांना कव्हर

भक्तांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन श्री गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) म्हणजेच उद्या (31 रोजी) होत आहे. दरवर्षी गणेशभक्तांमध्ये गणेशोत्सवाचा एक वेगळाच आनंद असतो. अशातच मुंबईतील गणेशोत्सवाचे (Mumbai News) एक वेगळे आकर्षण आहे. मुंबईतील गणेशोत्सवासाठी (Mumbai Ganesh Utsav 2022) देश विदेशातून भाविक येत असतात. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनासह लोकसहभागातून विविध उपाययोजना कारण्यात आल्या आहे. त्यानुसार गोदरेज समूहाच्या माध्यमातून मुंबईतील प्रमुख मंडळांवर सीसीटीव्हीची (CCTV) नजर राहणार आहे.

गोदरेज समूहातील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसचे बिझनेस युनिट गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने मुंबईतील प्रमुख गणेश मंडळांना कव्हर करणारे 300 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, यामध्ये भक्तांना ज्यांची सर्वात जास्त ओढ असते असे ‘लालबागचा राजा’, ‘मुंबईचा राजा – गणेशगल्ली’, ‘चिंतामणी’ यांचा समावेश आहे.

गोदरेज समूहातील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसचे एक बिझनेस युनिट गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने ‘डीकोडिंग सेफ अँड साउंड: इन द इंडियन कॉन्टेक्स्ट’ हे सर्वेक्षण नुकतेच केले. सुरक्षेसाठीच्या सुविधा, उपाययोजना याकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टीकोन कसा आहे ते या सर्वेक्षणात समजून घेण्यात आले आहे. गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सच्या या सर्वेक्षणात मुंबईतून सहभागी झालेल्यांपैकी 44 टक्के लोकांच्या मते स्वतःचे आणि प्रियजनांचे आरोग्य व्यवस्थित असणे म्हणजे ‘सुरक्षित व सुखरूप’ असणे आहे. हाच विषय पुढे नेत आणि सुरक्षेच्या मूलभूत मूल्यांना अनुसरून यंदाच्या वर्षी गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स मुंबईतील गणेशोत्सव सुरक्षितपणे व सुखरूप पार पडावा यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या अंतर्गत मुंबईतील अनेक प्रमुख गणेश मंडपांमध्ये 300 पेक्षा जास्त सिक्युरिटी/सीसीटीव्ही कॅमेरे, 2 डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर्स, हातात धरून वापरावयाचे 4 मेटल डिटेक्टर्स इन्स्टॉल केले आहेत.

याबाबत, गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सचे बिझनेस हेड पुष्कर गोखले म्हणाले, भारतातील अनेक भागांमध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. पण मुंबईच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्ये वेगळे असते. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, मुंबई अग्निशामक दल, वाहतूक नियंत्रण विभाग, मुंबईतील बस सेवा – बेस्ट, सैन्य दल आणि अशा इतर अनेक विभागांनी गणेशोत्सवासाठी तयारी पूर्ण केली आहे. आम्ही देखील यामध्ये सहभागी होऊन गणेश मंडपांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व नियंत्रण सुविधा इन्स्टॉल करत आहोत. गणेशभक्तांच्या आनंदात व समाधानात कुठेही कसूर राहू नये हा आमचा उद्देश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -