Thursday, July 24, 2025
Homeतंत्रज्ञानजिओ करणार मोठा धमाका, आता स्वस्तात मस्त लॅपटॉप करणार लॉंच..

जिओ करणार मोठा धमाका, आता स्वस्तात मस्त लॅपटॉप करणार लॉंच..

रिलायन्स इंडस्ट्रीजची 45वी वार्षिक सर्वसाधारण बैठक (AGM) नुकतीच पार पडली. या दरम्यान कंपनीने 5G सर्विसेजच्या लाँचिंगची अधिकृत घोषणा केली आहे. या सोबत कंपनीने जिओ बुक लॅपटॉपसंबंधी संकेत दिले आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने 45 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (AGM 2022) Reliance Jio 5G सेवा सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे. ही सेवा येत्या दिवाळीत कंपनी भारतात 5G सेवा सुरू करणार आहे. AGM 2022 मध्ये, कंपनीने 5G सेवेसह अनेक महत्वाच्या घोषणा केल्या असून त्यातीलच एक म्हणजे कंपनी येत्या काही दिवसांत JioBook लॅपटॉप लॉंच करणार आहे. पण कंपनीने या लॅपटॉपला कधीपर्यंत लाँच करणार आहे हे अधिकृतपणे सांगितलेले नाही.

जर तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा असेल तर तुम्ही काही महिने थांबू शकता, ज्याने तुम्हाला कमी पैशांत खरेदी करता येईल. कारण जिओचा हा लॅपटॉप इतर लॅपटॉपपेक्षा फारच स्वस्त असणार आहे. त्यामुळे तुम्हाला पैशांची बचत व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. त्याआधी एका रिपोर्टनुसार Jiobook चे अंदाजे काय असू शकतात फीचर्स, ते जाणून घ्या..

JioBook चे संभावित फीचर्स

रिपोर्टनुसार, या लॅपटॉपमध्ये 1366×768 पिक्सेल रिझोल्यूशनचा डिस्प्ले येऊ शकतो.
▪️ जिओ बुक लॅपटॉपमध्ये क्वॉलकॉम चिपसेट येऊ शकतो.
▪️ लॅपटॉपमध्ये क्वालकॉम प्रोसेसरसह 64 GB पर्यंत eMMC 5.1 स्टोरेज आणि 4 GB पर्यंत LPDDR4X रॅम मिळू शकतो.
▪️ JioBook Android OS चे एक फोर्कड व्हर्जन सोबत येईल.
▪️ अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आणि विंडोज 10 सह आणला जाऊ शकतो.
▪️ कनेक्टिव्हिटीसाठी, लॅपटॉपला HDMI पोर्ट, ड्युअल बँड Wi-Fi आणि ब्लूटूथचा सपोर्ट मिळू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -