गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणारी मद्य तस्करी लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज विभागाने मोठी कारवाई केली असून वाहनासह तब्बल सात लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की परराज्यातील उत्पादन शुल्क चुकविलेले आणि मद्य वाहतुकीवर असणारे निबंध यासाठी विविध तपासणी नाके लावण्यात आले आहेत. यावेळी तपासणी करत असताना एका टाटा एस कंपनीच्या टेम्पो मध्ये गोवा बनावटचे तब्बल ३७ बॉक्स आढळून आले. सदर मद्यसाठा जयवंत पांडुरंग चव्हाण रा. सांबरे या इसमाचा असून त्याला देखील अटक करण्यात आली आहे.
हि कारवाई आयुक्त कांतीलाल उमाप, बी. एच. तडवी, रविंद्र आवळे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एम. एस. गरुड, किरण आर. पाटील, एस. आर. ठोंबरे, बी. ए. सावंत. जी. एस. जाधव, एस. बी. चौगले, ए. टी. थोरात, यांनी केली असून पुढील तपास किरण पाटील करत आहेत. सदरच्या कारवाई मुळे मद्य तस्करांचे धाबे दणाणले असून त्यांच्यात एकच खळबळ माजली आहे.