Tuesday, July 29, 2025
HomeसांगलीSangli : लघुशंकेसाठी थांबलेल्या तरूणाला लुटणारे दोघे अटकेत

Sangli : लघुशंकेसाठी थांबलेल्या तरूणाला लुटणारे दोघे अटकेत

लघुशंकेसाठी थांबलेल्या प्रवाशास लुटणाऱ्या अंकलखोप येथील विनायक संजय कदम (वय २४), गणेश रामचंद्र सौदागर (वय २२) या दोघांना आष्टा पोलिसांनी आदमापूर येथील बाळुमामा मंदीर यात्रेतून ताब्यात घेतले. यावेळी अधिक तपासात केला असता मोटरसायकलची चोरीही उघड झाली आहे.

याबाबत आष्टा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २६
ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सागर रमेश मोरे, (रा. हनुमानगर, पोस्ट नुने, मेढा रोड, तालुका जिल्हा. सातारा) हे मार्केटींगकरीता आष्टामार्गे पलुसकडे जात होते. आष्टा तासगाव मार्गावर संस्कार लॉजच्या अलिकडे सुमारे २०० मिटर अंतरावर स्विफ्ट कार (क्र. एम.एच. ०१.ए.ई. ४४१७) रस्त्याकडेला थांबवून, लघुशंका करुन पुन्हा कारमध्ये बसले.

मोबाईलवर बोलत असताना दोन अज्ञात तरुण संगनमत करून कारचे दोन्ही दरवाजे उघडून आत घुसले. सागर मोरे यांना धक्काबुक्की करुन पकडून त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. तसेच त्यांना कारमधून बाहेर ढकलले. स्वीफ्ट कार व विवो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने चोरून तेथून पसार झाले. याबाबत सागर मोरे यांनी आष्टा पोलिसात फिर्याद दिली.

आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी दोन तपास पथके तयार करुन गुन्ह्याचा कसून तपास केला असता विनायक संजय कदम (वय २४, रा. अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली) व गणेश रामचंद्र सौदागर (वय २२, रा. गहिणीनाथनगर, अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली) या दोघांना दिनांक २७ रोजी भुदरगड पोलीस ठाणे कोल्हापूर यांचे मदतीने आदमापूर येथील बाळूमामा मंदीर यात्रेतून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता, सदर कार व मोबाईल असा एकूण ९३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात ताब्यात घेत त्यांना अटक केली.

पोलिसांनी अधीक तपास केला असता त्यांनी ४ ऑगस्ट रोजी इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतून एक मोटरसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्याकडून माहिती घेतली असता गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपींनी चोरलेली दुचाकी मोटरसायकल आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -