Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरKolhapur: मुलानेच गळा आवळून बापाला संपवले

Kolhapur: मुलानेच गळा आवळून बापाला संपवले

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात तिलारीनगरच्या बाजूला असलेल्या गुळंबमध्ये पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाची गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत बापाच्या दुसऱ्या मुलाने याबाबत पोलिसांकडे फिर्याद (fda complaint) दिल्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चंदगड तालुक्यातील तिलारीनगरच्या (fda complaint) बाजूला असलेल्या गुळंब येथे राजू सटू दळवी (वय 54) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संशयित रोहित राजू दळवी याला चंदगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वैभव राजू दळवी यांनी चंदगड ग्रामीण रुग्णालयात जावून पाहणी केली असता मयत राजू यांच्या चेहऱ्यावर ओरबडल्याच्या जखमा तसेच गळ्याभोवती काळा डाग दिसत होता. त्यामुळे शंका आल्याने वैभव यांनी भाऊ रोहितकडे वडिलांच्या मृत्यूबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भावाकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही. त्यामुळे रोहितने वडिलाचा गळा आवळून घातपात केल्याची फिर्याद भाऊ वैभवने चंदगड पोलिसात दिली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता खून केल्याची कबूली रोहितने दिली. अद्याप खून करण्यामागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. संशयित रोहित दळवीला ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -