म्हालसवडे : करवीर तालुक्यातील मांडरे येथे गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादा दरम्यान जेवणाच्या पंक्तीत मानाने पाणी सोडण्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाली. यावेळी एकाने गोळीबार देखील केल्याने गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान, काठय़ा आणि दगडाने झालेल्या हाणामारीत पाच जण जखमी झाले. उदय पाटील, संग्राम पाटील, रंगराव पाटील, अनिल पाटील व रोहित पाटील अशी जखमींची नावे आहेत.
याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या अभिजित सुरेश पाटील यांच्यासह बारा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. १० जणांना अटक करण्यात आली आहे. गोळीबार झाल्यान गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मांडरे येथील हनुमान तरुण मंडळाने काल, शुक्रवार (दि.२) रोजी सायंकाळी गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते. येथील रीतिरिवाजानुसार महाप्रसादाच्या वाटपावेळी अगरबत्ती लावून, पंक्तीत हातावरून पाणी सोडून जेवणाची सुरुवात केली जाते. यावेळी पाणी सोडण्याच्या मानापमानातून मंडळातीलच दोन गटात हाणामारी झाली यात उदय पाटील, संग्राम पाटील, रंगराव पाटील, अनित पाटील व रोहित पाटील जखमी झाले.
संशयित आरोपी अभिजीत पाटील याने बंदुकीचा परवान नसताना फिर्यादी उदय पाटील यांच्यावर बारा बोअरच्या बंदुकीने जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली. उदय पाटील हे बाजूला झाल्याने त्यांना गोळी लागली नाही. याबाबत उदय सोनबा पाटील यांनी आज, शनिवारी करवीर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
कोल्हापूर: गणेशोत्सवातील महाप्रसादावेळी गोळीबार, हाणामारीत पाचजण जखमी, १० जण अटकेत
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -