Sunday, August 3, 2025
Homeसांगलीअखेर मिरज मधील स्वागत कमानीवरून झालेल्या वादावर पडदा पडला स्वागत कमान जागेवरून...

अखेर मिरज मधील स्वागत कमानीवरून झालेल्या वादावर पडदा पडला स्वागत कमान जागेवरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात दिलजमाई

ताजी बातमी ऑनलाईन टीम

यंदाच्या वर्षी निर्बंध मुक्त गणेशोत्सवामुळे मिरज मध्ये स्वागत कमानी सुधा तितक्याच उत्साहाने उभारल्या जात आहेत, राज्यातील झालेले सत्तांतर त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष मिरजेतील स्वागत कमानीच्या बाबतीतही दिसून आला. गेली कित्येक वर्षे महाराणा प्रताप चौक येथे मनपा विभागीय कार्यालय जवळ शिवसेनेची स्वागत कमनीची परंपरा आहे.



पण यावेळी राज्यातील शिवसेना आणि शिंदे गटातील वर्चस्व वाद इथेही पाहायला मिळाला स्वागत कमानी साठी शिवसेना कडून आणि शिंदे गटाकडून प्रशासनाकडे परवानगी साठी अर्ज केले गेले पण प्रशासनाने सावध पवित्रा घेत जैसे थे परिस्थिती ठेवली आज शिवसेनेने आंदोलनाचा पावित्रा घेतल्यावर आज तहसीलदार दगडु कुंभार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे तासेच मनपा अतिरीक्त आयुक्त संजय ओहोळ सहा आयुक्त दत्तात्रय गायकवाड तसेच शिवसेना गटाचे चंद्रकांत मैगुरे आणि शिंदे गटाचे विजय शिंदे या प्रमुख नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले त्यानंतर या दोन नेत्यांमध्ये आपसात तोडगा निघून स्वागत कमान आणि स्वागत कक्षाच्या जागेबाबत सामोपचाराने आपसातील मतभेद दूर करून जागाही निश्चित करण्यात आल्या त्याप्रमाणे आता शिवसेनेची स्वागत कमान थोडी मागील बाजूस सरकली आहे.

तर शिंदे गटाला नव्याने स्वागत कक्ष उभारणीस परवानगी मिळेल आज झालेल्या बैठकीत दन्ही गटांनी मान्यता दिल्याने स्वागत कमानीच्या वादावर आता जरी पडदा पडला असला तरी शिवसेना बॅक फूट वर गेल्याचे दिसून येत आले तर शिंदे गटाचे वर्चस्वच राहिले आहे.तर शिंदे गट ह्याचा स्वागत स्टेज असणार आहे तर शिवसेनेची स्वागत कमान उभा राहणार आहे.


RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -